आजच आपल्या मुलाची मोफत शिक्षणाची तयारी करावी. 2022 -24 साठी आर टी ई २५% प्रवेश प्रक्रिया लवकरच चालू होत आहे त्यामध्ये प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरून घेण्यात येत आहेत. २० फेब्रुवारीपासून नवीन अर्ज प्रक्रिया चालू होत आहे त्यामध्ये ज्याचे उत्पन्न एक लाखापर्यंत आहे असे पालकांचे मुलं त्यासाठी पात्र आहेत. एका पालकाला एकदाच आपल्या मुलाचा अर्ज भरता येणार आहे .मदत केंद्रावर किंवा इंटरनेट जिथे सुविधा उपलब्ध आहे तिथून फॉर्म भरावा व फॉर्म भरताना वेगवेगळे प्रकारचे कागदपत्रे अपलोड करावी लागतात ज्यामध्ये रहिवासी पुरावा बालकाचे जन्मदिनांकांची नोंद जातीची नोंद इत्यादी कागदपत्र लागतात.
२५% ऑनलाईन प्रवेशासाठी कोणती बालके पात्र आहेत
ऑनलाइन एडमिशन साठी कोणती बालके पात्र आहेत जे बालके दुर्बल घटका अंतर्गत कुटुंबात राहतात ज्याचे ( पालकांचे) वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये पर्यंत आहे व जे जाती अनुसूचित जमाती आणि सर्व जाती धर्मातील विकलांग बालक आहेत त्यांच्यासाठी आहे
शाळेपासून किती किलोमीटर अंतरावरील रहिवासी अर्ज करू शकतात
शाळेपासून किती किलोमीटर अंतरावरील रहिवासी अर्ज करू शकतात तर पालकांना पाल्याच्या निवासस्थानापासून एक किलोमीटर ते तीन किलोमीटर अधिक अंतरावरील सर्व शाळेचा समावेश करता येतो परंतु प्राधान्य जवळच्या शाळेला दिले जात आहे त्याच्यापेक्षा दूर अंतरावरील शाळेनंतर प्राधान्य दिले जात आहे व नंबर लागल्यास त्यावेळेस विद्यार्थ्यांना वाहतुकीचा खर्च द्यावा लागतो अंतर तीन किलोमीटर पेक्षा जास्त असल्यास.
आर.टी.ई. २५ % online प्रवेशा करता लागणारी कागदपत्रे ही पालकाांनी online प्रवेश अर्ष भरण्याच्या तारखेपयंतचीच असावीत
प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे. Click On Below Link
आर.टी.ई. २५% आरक्षण प्रवेश प्रक्रिया (ऑनलाईन अर्ज)
भाग १ : शाळा
२५% मोफत प्रवेश प्रक्रिया २०१५-१६ या शैक्षणिकवर्षासाठी प्रवेश पात्र शाळांनीखाली दिलेली माहिती अचूक भरून आपल्या विभागातील प्राधिकृत यांजकडूनतपासून घ्यावी मगच आपल्या शाळेची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.
अ) शाळेची संपर्कासाठीची माहिती
ब) प्रवेशासाठी आवश्यक वयोगट माहिती.
क) प्रवेश वर्ग आणि ई.१ ली च्या वर्गाचा पट(३० सप्टे. २०१४),प्रवेश क्षमता, आणि २५% प्रवेशासाठीरिक्त जागा
ड) गुगल नकाशामध्ये आपल्या शाळेचे अचूक स्थान
भाग २ : बालक
पुढे दिलेल्या सूचनावाचून काळजीपूर्वकअर्ज भरावा.
१) प्रथम अर्ज नोंदणी करावी .मग आपल्याला अर्ज क्रमांक व पासवर्ड मोबाईलवरप्राप्त होईल.
२) बालकाची व पालकाची सर्व माहिती अचूक आणि खरी भरावी
३) आपल्या परिसरातील १ किंवा ३ किलोमीटर शाळा दिसत असल्यास नी क्लिक करावी.
४) बालकाच्या प्रवेशवर्गाचे नाव लिहावे.
५) शाळा क्लिक झाल्यास आवश्यक ती सर्व कागद पत्रे अपलोड करावीत.
६) सर्व प्रक्रिया पूर्ण केल्याची खात्री झाल्यावर मगच अर्ज कन्फर्म करावा
७) अर्ज कन्फर्म झाल्यावर त्याची प्रिंट काढून,आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह आपल्याजवळील मदत केंद्रावर जाऊन आपला अर्ज बरोबर भरला याची खात्री करून घेणे गरजेचे आहे.मदत केंद्रावरील अधिकारी आपला अर्ज बरोबर असल्याची खात्री करून देतील .व आपला अर्ज लॉटरी प्रक्रियेसाठी योग्य असल्याचे सांगतील
भाग ३ : सोडत
१) शाळेच्या प्रवेशस्थर वर्गाची प्रवेश क्षमता जास्त असेल आणि शाळेकडे कमी प्रवेशपात्र अर्ज आले असतील तर शाळा सर्व अर्जांना प्रवेश देईल.
२) शाळेकडे (शाळेची) प्रवेश क्षमता कमी असेल तर जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षण अधिकारी यांच्या द्वारा लॉटरी पद्धतीने ड्रॉ काढून प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल.
३) निवड झालेली यादी येथे प्रकाशित केली जाईल.
४) पालकांनी अर्ज क्रमांक भरून लॉगीन केल्यावर त्यांना यादी दिसेल व अॅडमिट कार्डची प्रिंट काढता येईल.
५) पालकांकडून आवश्यक व योग्य अशा सर्व गोष्टींची पूर्तता करून मगच शाळा प्रवेशपात्र बालकाला प्रवेश देईल.
अर्ज कसा करावा
RTE Website https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex ऍडमिशन पोर्टल वरती गेल्यावर तेथील होम पेज वरती रजिस्ट्रेशन न्यू रजिस्ट्रेशन लॉगिन असे वेगवेगळे प्रकारचे ऑप्शन आहेत तिथे क्लिक करून नवीन रजिस्ट्रेशन करून घ्यावे रजिस्ट्रेशन करताना मुलाचं वय चेक करून घ्यावे आधार कार्ड नुसार व तेथे फॉर्म भरावा.फॉर्म भरता वेळेस पासवर्ड आणि युजरनेम लक्षात ठेवावे , डिटेल्स व्यवस्थित भरावी व त्यानंतर लोकेशन ऍक्युरेट टाकून त्यामध्ये स्टॅंडर्ड गुगल मॅपिंग करून फॉर्म भरावा
Link For Aplication
Comments are closed.